Lokmat Political News | Social Media ट्रोल धाडीचे काँग्रेस ठरले बळी जाणून काय होत कारण |Rahul Gandhi

2021-09-13 2

सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या बऱ्याच घटना पाहायला मिळतात. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचं प्रमाण जास्त असतं ही बाब नाकारता येत नाही. सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या निशाण्यावर काँग्रेस पक्ष असल्याचं दिसून येत आहे. सोनम कपूरला केलेल्या एका ट्विटमुळे नेटकऱ्यांकडून काँग्रेसवर जोरदार टीका होऊ लागली आहे.सोनम कपूरने ट्विटरवर काँग्रेसला फॉलो केलं. फॉलो केल्याबद्दल तिचे आभार मानण्यासाठी ट्विट करण्यात आलं. या ट्विटमध्ये काँग्रेसनं लिहिलं की, ‘धन्यवाद सोनम कपूर, तुम्ही अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी आहात. तुमच्या आगामी वीरे दी वेडिंग या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फार उत्सुक आहोत.’ काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट पाहताच नेटकऱ्यांकडून टिकांचा भडीमार सुरू झाला. काहींनी उपरोधिक टोला लगावला तर काहींनी पक्षाची फिरकी घेतली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires